ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इंडिगोच्या धडकेत रोही ठार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – आदिलाबाद – आष्टी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ बी वरील कातलाबोडी फाट्याजवळ इंडिगो ने दिलेल्या धडकेत रोही जागीच ठार झाल्याची घटना सोमवार दिनांक ३ फेब्रुवारीला सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार,कोरपना कडून येणाऱ्या इंडिगो वाहन क्रमांक एम एच ३४ ए एम ५७७६ पुढे अचानकरीत्या रोही समोरासमोर धावत आल्याने इंडिगो व रोही यामध्ये जबर ठोस बसली.यात रोही जागीच ठार झाला. तसेच इंडिगो वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने इंडोगो तील चालक व सहप्रवासी यात बचावले. घटनेच्या पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये