ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला जनविकास सेनेचे समर्थन

चांदा ब्लास्ट

 राज्यातील मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये ,बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय सर्व्हे करण्यात यावा तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुली व मुलांचे स्वतंत्र वसतीगृह व स्वाधार योजना सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आंदोलनाला जनविकास सेनेने समर्थन दिले.

मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये इत्यादी मागण्यांसाठी राज्यभर ओबीसी महासंघातर्फे व ओबिसीच्या विविध संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे.

या मागण्यांच्या समर्थनार्थ ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी दिनांक 11 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले. दिनांक 17 सप्टेंबर ला ओबीसी महासंघातर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी महासंघाच्या अन्नत्याग आंदोलन व मोर्चाला जनविकासनेने समर्थन दिले.

 संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात जनविकास सेनेच्या एका शिष्टमंडळाने आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मंडपात रवींद्र टोंगे यांची भेट घेऊन त्यांना समर्थन जाहीर केले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिव सचिन राजूरकर,जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे,मनीषा बोबडे, इमदाद शेख,आकाश लोडे, प्रफुल बैरम सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई उध्दार उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये