ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बामणी गावातील असंख्य युवकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

राज्याचे मंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून भाजपा तालुका अध्यक्ष किशोर भाऊ पंदीलवार व रवी ढवस जी यांच्या नेतृत्वाखाली केला पक्षप्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.गणेश टोंगे

बल्लारपूर:भाजपा सरकारच्या वतीने नवनवीन राबवल्या जाणाऱ्या योजना त्यामुळे होणाऱ्या गोर गरीब जनतेला होणारा फायदा या साठी नेहमीच अग्रेसर असलेले वने सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री पालकमंत्री चंद्रपूर गोंदिया सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल फक्त चंद्रपूर साठीच राहिली नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भूरड पाडून राहिली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असताना असंख्य विकास कामाचा झंजावत आपल्या आमदार संघात खेचून प्रत्येक गोरगरिबांसाठी नवनवीन योजना आखत प्रत्येकाला आपलंसं करून घेतल्याचा चित्र आज पाहायला मिळत आहे.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील बामणी गावातील असंख्य तरुणांनी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष किशोर भाऊ पंदीलवार व रवी ढवस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कार्याला देव अधिक बळकटी देउन आमचे पण आयुष्य सुधीर भाऊ सोबत समाजाच्या सत्कारणी लागावं अशी इच्छा व्यक्त केली. सोबतच बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सुरु असलेल्या विकासकामांच्या झपाट्यामुळे येथील सर्वसामान्य माणूस सुखावला असुन व सुधिर भाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही भाजपा तालुका अध्यक्ष किशोर भाऊ पंदीलवार व रवी ढवस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये असंख्य युवकांचा समावेश असून त्यांचं भाजपा पदाधिकारी यांनी पुष्गुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांनी सर्वांच्या गळ्यात पक्षाचे दुपट्टे घालून त्यांचे स्वागत केले. व पुढील वाटालीसाठी शुभेच्छा दिल्या.

भाजप नेते किशोर भाऊ पंदिलवार.रवी ढवस. मोरेश्वर उद्दिसे. पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये मारोती गेडाम. पंकज गेडाम. पवन मडावी. राहुल चाहेकर. बंटी कुळसंगे. लीखीत शेरकी. प्रथम शेंडे. संकेत पाटील. जगीत जीवतोडे.यांचा समावेश आहे.

तर अंकीत ढवस.मोरेश्वर उद्दिसे.रवी ढवस. उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये