भद्रावती शहरात विविध ठिकाणी तान्हा पोळ्याचे आयोजन
चांदा ब्लास्ट :
अतुल कोल्हे भद्रावती :
शहरातील विविध प्रभागात तान्हा पोळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे असून काही ठिकाणी नंदीबैल सजावटीच्या स्पर्धा देखील घेण्यात आल्या आहेत.
शहरातील केटरर्स असोसिएशनच्या वतीने भद्रनाग मंदिर देवस्थान परिसरात नंदीबैल सजावटीवर भव्य स्पर्धा घेण्यात आली आहे. यात मोठ्या प्रमाणात बक्षिसांची खैरात ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विठ्ठल मंदिर परिसरात भरवीण्यात येणाऱ्या नंदीबैल तान्हा पोळ्यात लक्की ड्रॉ ठेवण्यात आला आहे. केवळ 99 पैशात विजेत्या स्पर्धकांना विविध बक्षिसे वितरित करण्यात येणार आहे. हा तान्हा पोळा उत्सव गौराळा, गुरुनगर, सुमठाना, किल्ला वार्ड, कुणबी सोसायटी,गौतम नगर व अन्य ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात येणार असून त्या ठिकाणी बालकांसह त्यांच्या पालकांची व परिसरातील नागरिकांची तान्हा पोळा पाहण्यासाठी मोठी गर्दी असणार आहे.