Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती :-
तालुक्यातील माजरी परिसरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी माजरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजरी  येथे राहणारी १६ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासह राहते. 8 सप्टेंबर रोजी वडील कामावर गेले होते. आई भाजी घेण्यासाठी बाजारात गेली होती. आई बाजारातून परतली तेव्हा मुलगी घरी नव्हती. दरम्यान वडील कामावरून परतल्यानंतर पत्नीने मुलगी घरी नसल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी घरभर आणि नातेवाईकांमध्ये तिचा शोध घेतला, नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र मुलगी कुठेच सापडली नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या ट्रकवर काम करणाऱ्या तरुणाशी तरुणीची मैत्री झाली होती. तो नेहमी पाण्याची गाडी घेऊन तिच्या घरासमोर यायचा. कॉलेजमध्येही तो तिला भेटायला जायचा. दरम्यान ही बाब वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी मुलीला कॉलेजमध्ये जाण्यापासून रोखले होते. यावरून मुलीच्या वडिलांनी तरुणावर आमिष दाखवून अपहरण केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीच्या आधारे माजरी पोलिसांनी रितेश हरिदास उपरे वय ​​२१ रा. पळसगाव या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अजितसिंह देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भोजराम लांजेवार करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये