ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन

सर्व उमेदवारांना रस्ता सुरक्षिततेसाठी स्वयंशिस्त लागावी यासाठी पॉम्पलेट देण्यात आले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत आज दिनांक 16.01.2024 रोजी येलाकेली टोल नाका येथे रस्ता सुरक्षा विषयक बॅनर लावण्यात आले व ट्रॅफिक नियमांचे मार्गदर्शन करणारे पॉम्पलेट देण्यात आले तसेच समृद्धी महामार्ग येथील प्रवास करणाऱ्या नागरिकांना समुदेशन करण्यात आले.

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय येथील मोटर वाहन निरीक्षक प्रफुल्ल मेश्राम, सहायक मोटर वाहन निरीक्षक विशाल भगत, वाहन चालक टिक्कस व टोल नाका येथील स्टाफ,राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण येथील स्टाफ उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा येथे अनुनेप्ती चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात आले तसेच सर्व उमेदवारांना रस्ता सुरक्षिततेसाठी स्वयंशिस्त लागावी यासाठी पॉम्पलेट देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये