Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मागास विद्यार्थ्यांनी लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा

जनसंपर्क अधिकारी नवनाथ वरारकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

“शासनाच्या विविध योजना लोककल्याणासाठी असतात पण याची रितसर माहिती अनेक विद्यार्थ्यांना नसते. सर्वांसाठीच काही नियम आखून शासनस्तरावर लोककल्याणकारी कामे केली जात असतात.निव्वळ एस.सी.,एस.टी.साठीच नाही तर ओ.बी.सी.व सर्वच आर्थिकदृष्टया मागासवर्गीय वर्गासाठी योजना आहेत,या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा” असे आवाहन चंद्रपूरचे जनसंपर्क अधिकारी, इतर मागास बहुजन कल्याण विभाग अधिकारी नवनाथ वरारकरांनी केले.ते चंद्रपूर विभाग इतर मागास बहुजन कल्याण लोककल्याणकारी योजनांचा प्रचार,प्रसार तालुकास्तरीय मेळाव्यात येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील स्व. कर्मयोगी मदनगोपाल भैया सभागृहात बोलत होते.

     कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डी एच गहाणे होते तर उपस्थितीत बीईओ मयूर लाडे,प्राचार्य डॉ राजन वानखेडे,ओबीसी महामंडळ प्रमुख तीर्थलवार,वीजेएनटी महामंडळाचे राठोड,डॉ राजेंद्र डांगे,डॉ रेखा मेश्राम इ.मान्यवर उपस्थित होते. यावेळी अधिका-यांनी विद्यार्थ्यांना विविध योजनांची माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ गहाणेंनी, आमच्या काळात आम्ही ईबीसी सवलत घेऊन शिक्षण पूर्ण केले असून नंतर अनेक योजनांचा अभ्यास केला, त्याचा फायदा आमच्या मुलांना व अनेकांना मी स्वतः करुन दिला,असे मार्गदर्शन केले.

      प्रास्ताविक प्रा.जयेश हजारेंनी तर संचालन डॉ. पद्माकर वानखडे तर आभार डॉ.भास्कर लेनगुरेंनी मानले. कार्यक्रमाला डॉ.धनराज खानोरकर,डॉ.रतन मेश्राम,डॉ. युवराज मेश्राम,डॉ.योगेश ठावरी,डॉ.हर्षा कानफाडे,डॉ. दर्शना उराडे,प्रा.बालाजी दमकोंडवार,डॉ.अतुल येरपुडे, पर्यवेक्षक प्रा.आनंद भोयर,प्रा ठोंबरे इ.मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये