Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

दारूबंदी, जुगार कायद्यान्वाये रेड

एकूण 39 हजार 210 रु. चा मुद्देमाल जप्तb

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने अवैध धंद्यावर कारवाईची मोहिम राबवून पो.स्टे. वर्धा शहर हद्दीत मुखबीरचे खबरेवरून यातील नमुद आरोपीतांवर मौजा दयाल नगर स्टेशन फाईल, वर्धा येथे सापळा रचुन दारूबंदी व जुगार (सट्टा पट्टी) बाबत प्रो.रेड केला असता, आरोपी हे मोक्कावर रंगेहाथ देशी, विदेशी दारू मालाची अवैधरित्या विक्री तसेच जुगार (सट्टा पट्टी) चा अवैद्य व्यवसाय करताना मिळुन आला. तरी 1) पंकज सुरज बालवे , वय 31 वर्ष, रा. दयाल नगर, स्टेशन फेल, वर्धा 2) राजा बालवे, रा. दयाल नगर, स्टेशन फेल, वर्धा (पसार) दोन्ही आरोपी हे स्वतःचे आर्थिक फायदा करिता अवैधरित्या दारूविक्री व सट्टा पट्टीचा जुगार करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीतांचे ताब्यातुन, वरील नमुद वर्णनाचा जु.किं. 39210/- रू. चा मुद्देमाल जप्त करून,  सदर मुद्देमाल व आरोपी 1) पंकज सुरज बालवे , वय 31 वर्ष, रा. दयाल नगर, स्टेशन फेल, वर्धा  यांना वर्धा शहर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात पुढील कारवाई करता देण्यात आले व सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
कारवाई पथक मा. पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विनोद चौधरी, पो.उपनि. लालपालवाले, पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे, सागर भोसले, पो. अंम. संघसेन कांबळे, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये