ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गाडेगाव कोळसा खाण होणार

१५ एप्रिलला सेक्शन ९ ची अधिसूचना जारी ; वेकोली करणार ८ गावातील जमीनीचे अधिग्रहण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना : वेकोलीच्या वणी क्षेत्रातील सर्वात मोठी खुली कोळसा खाण असलेल्या पैनगंगा कोळसा खाणींचे विस्तारीकरण करण्यात येत असून कोळशाची वाढती मागणी लक्षात घेता पैनगंगा खुल्या कोळसा खाणीची दुसरी कोळसा खाण गाडेगाव खाण या नावाने सुरू होत असून यासाठी जमीन अधिग्रहण करण्याच्या सेक्शन ९ ची अधिसूचना वेकोलिकडून जाहीर केली असून या कोळसा खाणीसाठी गाडेगाव सह ८ गावातील जमिनीचे कोळसा खाणीसाठी अधिग्रहण करण्यात येणार आहे.

वेकोलीच्या वणी क्षेत्रातील सर्वात मोठी उत्पादन देणारी कोळसा खान म्हणून पैनगंगा खुल्या कोळसा खाणीचे नाव घेतले जाते.या कोळसा विरूर गावाजवळ कोळशाचे मुबलक प्रमाणात साठे आढळून आल्याने वेकोलिने काही वर्षांपूर्वी विरूर गावाचे पुनर्वसन केले.त्यांनतर टप्याटप्याने वेकोली प्रशासनाने परिसरातील जमिनींचे अधिग्रहण केले.

मात्र कोळशाची वाढती मागणी लक्षात घेता आता पैनगंगा खुल्या कोळसा खाणींचे विस्तारीकरण करण्यात आले असून पैनगंगा खुल्या कोळसा खाणीची दुसरी कोळसा खान गाडेगाव या नवीन नावाने सुरू करण्यात येणार असून खाणीसाठी लागणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहण सेक्शन ९ ची अधिसूचना वेकोली प्रशासनाने १५ एप्रिलला जारी केली असून या गाडेगाव खुल्या कोळसा खाणीसाठी विरूर, सोनुर्ली, गाडेगाव, कविठगाव, खैरगाव, हिरापूर, सांगोडा, कारवाई गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये