ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामूहिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ द्या

अनिल कवरासे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

      शासनाकडून शेतकऱ्यांना त्याच्या पिकाची नुसकान भरपाई मिळावी म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजना ही एक रुपयात विमा काढला जात आहे.ही प्रक्रिया आनलाईन आहे.मात्र कोरपना आदिवासी तालुक्यात उमरहिरा मांगलंहीरा ,थिप्पा, या गावात महसूल व वनजमिनीवर अतिक्रम करून असल्याने शासनाने त्याना त्याच्या नावाने पट्टा दिला मात्र एका सर्वे नंबरवर एका पेक्षा जास्त शेताऱ्याच्या नावाने पट्ट्या ची नोंद घेण्यात आली आहे एका सर्वेनंबर सातबारा उतार्यात पंढरा ते विस शेतकऱ्याच्या नावाची सामूहिक नोंद घेण्यात आली आहे.तसेच आजपर्यत सामूहिक सातबाऱ्यावर शासनाकडून दिलेल्या सर्व योजनाचा लाभ यासातबारावर मिळाला मात्र प्रधानमंत्री पिक.विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.

सामूहिक साठबारावर आनलाईन प्रक्रिया होत नाही त्यामुळे कोरपणा तालुक्यातील हजारो शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजने पासून वंचित राहतील तरी सामूहिक साताबारा असलेल्या शेतकऱ्यांनी या बाबतील अडचण दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी, तहसिलदार,जिल्हा कृषी अधिकारी,विमा कंपनी प्रतिनिधी यांनी तात्काल लक्ष देऊन सर्वांना विमा द्यावा एकाही सामूहिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांना विमा साठी असलेली अडचण दूर करावी अशी मागणी अनिल कवरासे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये