Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पत्रकाराची हत्या करून पत्रकाराचा गळा दाबण्याची घडली भयंकर घटना

छत्तीसगड येथील घटना : पोलिसांनी केले हैदराबाद येथून आरोपीला अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           सध्याच्या परिस्थितीत प्रसार माध्यमांचे गळे दाबण्याचे प्रकार दिल्ली ते गल्लीपर्यंत घडत आहे. त्यात केंद्राच्या ईडी, सीबीआय सारख्या संस्था सुद्धा सहभागी झाल्या आहेत. प्रशासन ज्यांना हात लावू शकत नाही. त्यांचा हिशोब वेगवेगळ्या माफीयांच्या माध्यमातून होत आहे. असाच एक प्रकार छत्तीसगड मध्ये घडला. ज्यात एका 32 वर्षीय युवा पत्रकाराची निरगुण हत्या झाली. त्याला जवळपास 20 जखमा आहेत. त्याचे हृदय कापले गेले आणि त्यानंतर त्याचे प्रेत सेफ्टी टॅंक मध्ये टाकून त्यावर प्लास्टर करण्यात आले. 3 जानेवारीला त्याचा मृतदेह सापडला आणि 6 जानेवारीला या खुणाचा मास्टर माईंडला छत्तीसगड पोलिसांनी हैदराबाद ( तेलंगणा ) येथून अटक केली. ग्रामीण भागात पत्रकारिता करण्याची किंमत या युवकाकडून त्याचा जीव घेऊन करण्यात आली. मारेकऱ्यांपैकी काहीजणांनी एलबी सुद्धा तयार केली. मारेकऱ्यांमध्ये मरणाऱ्या पत्रकाराचा एक जिवलग मित्र सुद्धा आहे. पण त्याने मित्रत्वाला मागे ठेवून बंधू प्रेमाला जास्त भाव दिल्याने पत्रकाराचा जीव घेताना त्याला काही वाटले नाही. यासंदर्भातून असे सुद्धा सांगायचे आहे की इतर ठिकाणी कधी नोटीस देऊन प्रसार माध्यमांना गप्प बसविण्याचा प्रयत्न होतो, कोणावर खोटे गुन्हे दाखल होतात आणि काहींना मारहाण सुद्धा होते. असाच एक पत्रकार ज्याची स्वतःची वृत्तवाहिनी होती त्यांना 18 वर्षे त्रास देऊन सरकारने त्यांची वृत्तवाहिनी विकायला लावली आणि 18 वर्षानंतर त्यांचा प्रकरणात कोणतेही पुरावे उपलब्ध नाही असे म्हणून ती संचिका बंद केली. पण या 18 वर्षाचा हिशोब कोण माघेल. आम्हाला असे सुचवायचे आहे की, पत्रकारिता करीतअसतांना आपल्या जिवाचा सुद्धा धोका असतो. यासाठी पत्रकारांनी सतत चाणक्य नजरेने आपल्या आसपासच्या परिसरातील, व्यक्तींना तपासायला हवे. तरच तुम्ही सक्षमपणे पत्रकारिता करू शकता.

              छत्तीसगड राज्यांमध्ये विसापूर नावाचा जिल्हा आहे या ठिकाणी मुकेश चंद्राकर हे 32 वर्षे युवा पत्रकार कार्यरत होते. अनेक प्रसार माध्यमांमध्ये काम करून आपले कुटुंब चालविण्यासाठी आवश्यक उत्पन्न होत नव्हते तेव्हा त्यांनी इतरांना मदत करत आपले स्वतःचे यूट्यूब चैनल चालू केले. त्याचे आज पावणेदोन लाख सबस्क्रायबर आहे. चुकीच्या कामाविरुद्ध बातम्या तयार करणे हाच उद्देश त्यांनी ठेवला होता. त्यांची काही उदाहरणे अशी सांगता येतील सन एक 2019 मध्ये विसापूर जिल्ह्यात तयार झालेल्या एका पुलाची वाताहत एकाच वर्षात झाली. त्यानंतर चार वर्षे त्रास सहन करून तेथील आदिवासी जनतेने गावातील छोट्या छोट्या वस्तूंचा आधार घेऊन तेथे एक लाकडी पूल बनविला त्यांची एक बातमी त्यांनी केली होती. त्याच जिल्ह्यातील 50 कोटीच्या रस्त्याचे टेंडर सुरेश चंद्राकर याला भेटले पुढे ते 110 कोटीचे झाले. त्या रस्त्यावर पायी चालताना त्यातील वाळू, गिट्टी आपल्या पायाने पुढे सरकत होती म्हणजेच सिमेंटचा तर पत्ताच नव्हता! मरणारा चंद्राकर आणि मारणारा चंद्राकर म्हणजे नक्कीच ते भावकीतील आहेत.

       प्राप्त झालेल्या माहितीनुसार सुरेश चंद्राकर काही वर्षांपूर्वी पंधराशे रुपयांची नोकरी करणारा व्यक्ती होता 110 कोटीचा रस्ता बनविताना बहुटेक सुरेश चंद्राकरणे विचार केला असेल, की या भागात आदिवासी लोक राहतात यांच्याकडे चार चाकीतर सोडाच दुचाकी किंवा सायकल सुद्धा उपलब्ध नाही म्हणून मी जो रस्ता तयार करतो आहे तो यांच्या साठी अप्रतिम आहे. कारण 1500 रुपयांची नोकरी करणारा हा चंद्राकर काही दिवसात एवढा प्रसिद्ध झाला की आपल्या लग्नाची वरात त्याने हेलिकॉप्टर मधून नेली होती. त्याचाही मीडियाने गवागवा केला होता. आणि माझी ही सर्व माहिती मीडियाला मुकेश चंद्राकरने पुरवली असा त्याचा समज होता. दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी मुकेश चंद्राकरला सुरेश चंद्राकर च्या हस्तकांनी एका खेळण्याच्या मैदानावर बोलावले आणि तो गायब झाला.

3 जानेवारी रोजी त्याचे प्रेत सेप्टिक टॅंक मध्ये सापडले. त्याच्या जखमांचे विश्लेषण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी असे केले आहे की त्याच्या 15 अस्थी तोडण्यात आल्या होत्या. त्याच्या शरीरावर इतर ठिकाणी अनेक जखमा होत्या. त्याच्या मानेचे हाड तुटलेले होते, त्याच्या कमरेचे हाड तुटले होते एवढेच नव्हे तर त्याच्या हृदयाचे सुद्धा दोन भाग झाले होते. यावरून त्याची हत्या किती निर्गुण होती, अमानवीय, कायद्याच्या भाषेतील रेअरेस्ट ऑफ रेयर या शब्दात बसणारी आहे. त्याची हत्या करून त्याला सेफ्टी टॅंक मध्ये टाकले हा तर त्याच्यापेक्षा वाईट प्रकार आहे.

आता गुन्हा दाखल झाला आहे. अनेक आरोपींना अटक झाली आहे. पण यातील सुरेश चंद्राकरला हैदराबाद येथून अटक झाली असुन 1 जानेवारीला तो विसापूर जिल्ह्यात नसून जगदलपूर जिल्ह्यात आहे असे त्यांचे मोबाईल लोकेशन सांगते. सुरेश चंद्राकर चा एक भाऊ पत्रकार मुकेश चंद्राकरचा जिवलग मित्र होता. पण त्याने हत्या करतांना आपल्या मित्राला मानवीय दृष्टिकोनातून पाहिले नाही असेल का! अशी अवस्था झाली आहे.

       पत्रकारितेची अवस्था छत्तीसगड राज्यात झालेल्या पत्रकाराचा खून हा देशासाठी कलंक आहे. दिल्ली ते गल्लीपर्यंत पत्रकारांशी बोबडी वडावण्यासाठी भरपूर काही कार्यक्रम आज सुरू आहेत. भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता असे म्हणण्याची वेळ समाप्त झाली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांना जास्त सगज राहण्याची गरज आहे. पत्रकारांवर विविध प्रकारचे होणारे आरोप जसे खंडणी, वित्त पत्रकारिता, खाणे-पिने, मागण्याची सवय याला सुद्धा आपण सर्व पत्रकारांनी दूर सारायला हवे तरच आपल्या अस्तित्वाला धोका होणार नाही. कारण असे सांगितले जाते की तुमच्यासमोर बोलले जाते ती तुमची प्रशंसा असते आणि तुमच्या माघारी बोलले जाते ते तुमचे व्यक्तिमत्व असते.

      अशाच प्रकारे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून पत्रकारांविरुद्ध खलबत्ते चालूच असतात कुठे-कोणाला नोटीस दिले जाते. कुठे-कोणाला आहे अवैद्य धंद्यांची जागा विचारली जाते म्हणजेच पत्रकारांच्या लेखणीला बोथट करण्याचा हा प्रकार आहे.

काही महाभाग तर अस आहेत की पत्रकारांच्या कुटुंबावर सुद्धा चुकीचे आणि खोटे आरोप करून त्यांना पोखरण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस मात्र काही पत्रकारांची सहनशिलता समाप्त होते. आणि ते स्वतःच आपल्या लेखणीला आपल्या हाताने पोथट करून कचराकुंडीमध्ये फेकून देतात अशा परिस्थितीत माझ्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला स्वतःलाच मेहनत करायची आहे.

त्या मेहनतीसाठी कधीच पाऊल मागे घेऊ नका कारण आजपर्यंतचा इतिहास आहे की सत्याचाच विजय होत असतो. मुकेश चंद्राकरच्या आई आणि भाऊ यांना झालेल्या दुःखात आम्ही सर्व पत्रकार आपल्या संवेदना व्यक्त करीत आहोत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये