ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुर-अंचलेश्वर गेट-बल्लारपुर बससेवा वेळेत सुरू करा, उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे आगारप्रमुखांना निवेदन

अन्यथा बस रोको आंदोलन करणार - राजु झोडे

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर शहरातून बल्लारपूरात व बल्लारपुरातील अनेक विद्यार्थ्यां शिक्षणासाठी चंद्रपुरात दररोज ये जा करतात.मात्र सिटी बस वेळेत येत नसल्यानं त्यांची चांगलीच गैरसोय होत आहे.त्यामुळं चंद्रपुर-अंचलेश्वर गेट-बल्लारपुर बससेवा सुरू करा, अशी मागणी उलगुलान संघटनेच्या वतीने करण्यात आली असून संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी आज सोमवारी आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे.

चंद्रपूर व बल्लारपूर हे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाते.तर चंद्रपूर आणि बल्लारपूर व्यापार सुद्धा मोठ्या प्रमाणात चालतो.मात्र चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट पासून बल्लारपुरात जाण्यासाठी सिटी बस उपलब्ध आहे.पण बसच्या वेळ ठरवून नसल्याने विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना ये जा करण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे.परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, वेळ व पैसे वाया जात आहे.

हीच बाब लक्षात घेता आज सोमवारी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आगरप्रमुखांशी चर्चा केली व बसेस नियमित सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी श्यामभाऊ झिलपे, दामोदर डेहने, पंचशील तामगाडगे, प्रदीप झामरे, जाकिर खान,सोबत असंख्य विद्यार्थी निवेदन देतानी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये