ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव मही येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव महीं येथील एका 24 वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 31 ऑगस्ट ला रात्री 11 वाजता घडली

 फिर्यादीलक्ष्मण तुकाराम शिंदे यांनी पोलिस ठाण्यात रिपोर्ट दिला की त्यांचा पुतण्या मृतक नामे अंबादास राजाराम शिंदे, वय 24 वर्षे, रा. देउळगाव मही हा राहते घरी स्लॅपचे हुकला दोरीचे सहायाने गळफास घेवुन मरण पावला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत पोस्टमार्टंम साठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये