Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

चिरादेवी येथे काशीमाय यात्रेचे आयोजन

परिसरातील हजारो भाविक घेणार दर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील चिरादेवी येथील काशीमाय देवस्थान समितीच्या वतीने काशीमाय मंदिरात भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

चिरादेवी हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा काशीमाय देवस्थान समितीच्या पुढाकाराने १ जानेवारी २०२५ रोजी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ही यात्रा भरते. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

४० वर्षांपूर्वी या ठिकाणी पाण्याचा झरा होता. त्याचे पाणी सतत वाहत असे. पूर्वी वाहन नसल्यामुळे कोची, घोनाड, चिरादेवी येथील लोक बाजाराला पायी भद्रावतीला जायचे. येणारे- जाणारे नागरिक त्या झऱ्याचे पाणी पित असत. मुख्य म्हणजे तो झरा बाराही महिने जसाच्या तसाच भरून दिसत असे. त्यामुळे गावातीलच स्व. गोंविदा तलांडे यांनी आपल्या कल्पनेतून गायमुख तयार केले आणि तिथेच एक टाकी बांधण्यात आले. उन्हाळ्यात जनावरे त्या टाक्यातील पाणी पिऊन तहान भागवत असत. नंतर त्यांनी पिंड तयार करून गावकऱ्यांच्या विचारविनिमयाने १९७६ पासून यात्रा सुरू केली.

काही वर्षांनंतर तिथे लोकवर्गणीतून शिवशंकराचे मंदिर बांधण्यात आले. आज या ठिकाणाला परीसरातील प्रसिद्ध असे “काशीमाय देवस्थान” म्हणून ओळखले जाते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये