ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देऊळगाव राजाच्या वतीने सहकार विद्या मंदिर येथे दहा करोड नशा मुक्त अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राजयोग एज्युकेशन व रिसर्च फाउंडेशनच्या चिकित्सा विभाग द्वारा आयोजित 10 करोड नशामुक्ती प्रतिज्ञा महा अभियान अंतर्गत नशा मुक्त जागरूकता व राष्ट्रीय प्रतिज्ञा कार्यक्रम चे आयोजन स्थानिक ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देऊळगाव राजा च्या वतीने तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे, त्या अनुषंगाने स्थानिक सहकार विद्या मंदिर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या सुजिता सुरडकर, ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देऊळगाव राजा येथील देवकला दिदी, अर्चना दिदी, सुभाष ढाकणे, सविता गवई, उपस्थित होत्या,देवकला दिदी यांनी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देऊळगाव राजा येथे सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली तसेच नशेली पदार्थ च्या सेवनाचे दुष्परिणाम सांगितले, स्वस्थ, मूल्य आधारित तथा व्यसन मुक्त जीवनशैली चा अवलंब करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले, नशा मुक्ती ची प्रतिज्ञा देण्यात आली.

अर्चना दिदी यांनी मोबाईल चे दुष्परिणाम सांगितले विद्यार्थ्यांनी मोबाईल चा वापर केवळ अभ्यासासाठी करावा असे सांगितले, याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये