ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुकुल महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

      गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागा तर्फे दिनांक 24/8/2024 रोजी ‘वाणिज्य शिक्षण : कौशल्य, करिअर आणि संधी’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

      या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक डॉ.सुरेशजी मोहितकर,माजी प्राचार्य,खत्री महाविद्यालय चंद्रपूर,डॉ. जनार्दन काकडे,प्राचार्य,खत्री महाविद्यालय चंद्रपूर, डॉ. रवि वाळके सहाय्यक प्राध्यापक खत्री महाविद्यालय चंद्रपूर, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव तथा प्राचार्य श्री. अनिल मुसळे, गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे,डॉ. प्रशांत पुराणिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

     या कार्यक्रमात डॉ. सुरेशजी मोहितकर यांनी वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर नौकरी व्यतिरिक्त व्यापार व उद्योग क्षेत्रात काम करता येते असे मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. काकडे यांनी वित्त व बँकिंग या क्षेत्रात उत्पन्न होणाऱ्या रोजगाराकरिता वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना उत्तम संधी प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे वाणिज्य शाखेतून उच्च शिक्षण घेतल्यास रोजगाराच्या बऱ्याच संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होईल असे मार्गदर्शन केले. तर डॉ.रवि वाळके यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे व त्याकरिता त्यांनी विशेष प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले.

       या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ. निता मुसळे, प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका सौ. वैशाली जमदाडे यांनी केले.

       ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता प्रा. सचिन करनेवार, प्राध्यापिका सौ संगीता बल्की,नीलिमा हजारे स्मिता देवतळे,प्रा. रत्नाकर बोभाटे प्रा. स्वप्निल सातपुते प्रा. प्रकाश लालसरे,प्रा. विकास दुर्योधन,प्रा. गणेश बांगडे, क्रीडा शिक्षक प्रमोद वाघाळे, संतोष चौधरी,प्रफुल मुसळे, प्रशांत नवले,शालिक कांबळे,ननिता बुरान,भास्कर गोंडे,सविन मडावी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये