एसआयआर अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी बुथ स्तरावर नियोजन करा – आ. जोरगेवार
भाजप चंद्रपूर महानगर कोअर कमिटी व एसआयआर प्रमुखांच्या बैठकीत आ. जोरगेवार यांचे प्रतिपादन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने महानगर जिल्हा कोअर कमिटी व एसआयआर प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक चंद्रपूर महानगर कार्यालयात पार पडली. बैठकीला आमदार किशोर जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एसआयआर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात पदाधिकारी व एसआयआर प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रदेश उपाध्यक्ष विलास कोहाळे, माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, महामंत्री श्याम कनकम, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, तुषार सोम, दशरथसिंह ठाकूर, बलराम डोडाणी, नगरसेविका अनुजा तायडे, सारिका संदुरकर, नगर सेवक जितेश कुळमेथे, नितेश गवळी, सुमित बेले, प्रविण गिलबिले, राशिद हुसेन, कौसर खान, यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, एसआयआर अभियान हे मतदार यादीच्या शुद्धीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत कायम राहणे, तसेच आवश्यक दुरुस्ती आणि नोंदी योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि एसआयआर प्रमुखाने आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी.
ते पुढे म्हणाले की, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात एसआयआरचे काम उत्तमरीत्या सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत काही त्रुटी किंवा उणिवा राहिल्या असतील तर त्या दूर करून प्रशासनासोबत योग्य समन्वय साधावा. अभियानाचे काम अधिक प्रभावी आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत.
एसआयआर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधावा. बूथनिहाय नियोजन करून अभियानाची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावी. मतदार यादीसंदर्भातील नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहनही आ. जोरगेवार यांनी केले.
संघटनेची ताकद ही बूथस्तरावरील कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असते. त्यामुळे एसआयआर अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बूथवर प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे. पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास अभियान अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येईल, असेही आ. जोरगेवार यांनी सांगितले.
बैठकीत एसआयआर अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील अभियानाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच काही त्रुटी किंवा उणिवा असल्यास त्या दूर करून प्रशासनासोबत समन्वय साधण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यासोबतच महानगरातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेऊन आगामी काळातील नियोजनाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.



