ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय सैन्य दल मधुन २० वर्ष नौकरी पुर्ण करुन सेवा निवृत्तीनंतर प्रथमच शहरात

पैरामिलिट्री माजी सैनिक संघटना आणि परीसरातील नागरिकांच्या वतीने ढोल, ताशे आणि फटाक्याच्या आतिषबाजी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  दि. 04 फेब्रुवारी 2024 रोजी अंजनगांवन सुर्जी शहरातील श्री अनिल येउल, BSF भारतीय सैन्य दल मधुन २० वर्ष नौकरी पुर्ण करुन सेवा निवृत्तीनंतर प्रथमच शहरात आल्यानंतर पैरामिलिट्री माजी सैनिक संघटना आणि परीसरातील नागरिकांच्या वतीने ढोल, ताशे आणि फटाक्याच्या आतिषबाजी करीत जंगी स्वागत करण्यात आले.

येथिल संत रुपलाल महाराज यांच्या समाधीला अभिवादन करुन व पुष्पहार अर्पण करुन विठ्ठल मंदिरापासुन भव्य रँलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात येऊल यांची फुलांनी व हारांनी सजविलेल्या गाडीतुन भव्य मिरवणुक काढण्यात आली.भारत माता की जय चा नागरीकांनी जयघोष केला तसेच ठिकठिकाणी माता भगिंनीनी

औक्षवंत केले.तसेच सामाजिक, व्यापारी, राजकीय व्यक्ती आणि नागरिकांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्या गेले. यावेळी सर्व माजी सैनिक, समाजबांधव तसेच येऊल परिवार व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये