Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हक्काच्या लढ्यात अल्पसंख्यांक युवकांनी पुढाकार घ्यावा – शाहिद रंगूणवाला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 कोरपना : ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लमिन कमिटीच्या वतीने कोरपणा येथे अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांवर विचार मंथन संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अमान अहमद जिल्हाध्यक्ष कार्यक्रमाचे उद्घाटक शाहिद रंगूनवाला विदर्भ प्रदेश अध्यक्ष सय्यद आबीद अली जिल्हाध्यक्ष जन सत्याग्रह संघटना, तसेच कीर्तीताई डोंगरे प्रदेश महिला एम. आय. एम. आघाडी अध्यक्ष अजहर शेख यांनी समाजातील दुरावा व विकासाच्या प्रवाहापासून समाजात आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक, पिछाडी सातत्याने होत असून मुस्लिम समाजामध्ये मुस्लिम समाजाला अनेक कारणात गुंतवण्याचा व विकासात अडचण निर्माण करण्याच्या घटना वाढल्या आहे.

समाजामध्ये शिक्षण, संरक्षण, आरक्षण, या बाबी सच्चर समिती अहवालात 2006 मध्ये उघड होऊन सुद्धा या विषयाकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. वक्फ नियमाच्या संशोधनाच्या नावावर वक्फ मालमत्ता हरपण्याचा कारस्थानाचे फोन कॉल करणे आवश्यक आहे. शासन अल्पसंख्यांक कल्याणाची नेहमी चर्चा करते मात्र योजना तयार करून त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अल्पसंख्यांक समाज विकासापासून बाहेर फेकल्या जाते अनेक निधीची तरतूद होऊनयी त्याची अंमलबजावणी होत नाही समाजातील महिला व युवकांनी पुढाकार घेऊन समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार गरजेचा आहे. समाजातील शिक्षणाला अग्रक्रम देऊन आपण बोलणारे नव्हे तर प्रश्न विचारणारे कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजे एकजुटीने हक्कासाठी समोर येण्याची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा वक्त्यांनी मत व्यक्त करून केले यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे सुनीलजी बावणे, शेतकरी संघटनेचे एडवोकेट श्रीनिवास मुसळे, वंचित बहुजन आघाडीचे विजयजी जीवने, तसेच शिवसेना उभाटाचे शहराध्यक्ष मोबीन बेग शाहिद शेख मंचावर उपस्थित होते. कोरपणा येथील महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजक शौकत अली, अल्ताफ बेग, शारीक अली, शेबाज अली, नदीम अली, ज. शेरखान, हाजी रफिक साहब,मोहब्बत खान, शहबाज बेग, मतीन सय्यद हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक सय्यद सोहेल अली यांनी केले तसेच आभार प्रदर्शन एजाज शेख यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये