Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

श्री. संताजी जगनाडे महाराजांची जयंती थाटामाटात साजरी होणार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

संत श्री संताजी सेवा मंडळाच्या वतीने येत्या ८ डिसेंबर (रविवार) रोजी साजरी केली जाणार आहे. यावेळी दिंडी (मिरवणूक), गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे, अशी विनंती संत श्री संताजी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

   तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर रोजी आहे. संत श्री संताजी सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या थाटामाटात जयंती साजरी केली जाते. यावर्षी संत गजानन महाराज येथील पावन भूमी शेगाव येथील वारकरी भजन मंडळी या सोहळ्यात विशेष आकर्षण राहणार आहे. हा जयंती सोहळा संत श्री संताजी सेवा मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येणार असून सकाळी १० वाजता पूजा आरती व दुपारी २ ते ६ दरम्यान संत श्री.संताजी जगनाडे महाराजांची दिंडी (मिरवणूक), व ६ ते ८ दरम्यान मान्यवरांचे भाषण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि महाप्रसाद अंती कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

या कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे, हि विनंती संत श्री. संताजी सेवा मंडळाच्या मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये