Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पुन्हा एकदा जुगनाळा ठरली सर्वच क्रीडा प्रकारात अव्वल

प्राथमिक, माध्यमिक, सांस्कृतिक व जनरल चॅम्पियनशिप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- उज्वल यशाची परंपरा कायम राखत यंदाच्या गांगलवाडी बीटा च्या दिनांक 20-01-2025 ते 22-01-2025 या कालावधीत झालेल्या बीटस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुगनाळा येथिल प्राथमिक व माध्यमिक चमुनी घवघवीत यश संपादित केले.

सर्वच क्रीडा प्रकार तसेच सांस्कृतिक, दार्शनिक कवायत देखील अव्वल ठरली. प्राथमिक मुले कबड्डी,प्राथमिक मुले खोखो, माध्यमिक मुले खोखो, माध्यमिक मुली खोखो या मैदानी खेळात प्रथम तर प्राथमिक मुली खोखो द्वितीय क्रमांक पटकावला. या शिवाय वैयक्तीक क्रिडा प्रकारातील 100 मीटर , 200मीटर, रीले रेस, लांब उडी, उंच उडी, थाळी फेक सांस्कृतिक प्रकारातील नक्कल,फॅन्सी ड्रेस, समूह गायन प्रकारात अव्वल ठरली.

शिवाय दार्शनिक कवायत उत्कृष्ट ठरली. त्यामुळे जुगनाळा शाळेचा क्रिडा क्षेत्रातील वर्चस्व कायम ठेवीत यंदाची चॅम्पियन शाळा ठरली. गावकऱ्यांनी विद्यार्थ्याचे कौतुक करीत अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये