Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

देऊळगाव राजा येथील विद्यार्थ्यांना कराटे बेल्टचे वितरण 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यातील स्किल डेव्हलपमेंट हेल्थ अँड स्पोर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना कराटे बेल्ट वितरण करण्यात आले.

देऊळगाव राजा येथे नुकतीच स्किल डेव्हलपमेंट स्पोर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची कराटे ची बेल्ट परीक्षा घेण्यात आली या परीक्षेमध्ये एकूण 17 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष न प श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल देऊळगाव राजा शाळेचे मुख्याध्यापक संजय देशमुख यांच्या हस्ते बेल्ट वितरण करण्यात आले मैथिली तायडे ,तृप्ती जाधव, मधुरा गायकवाड, स्वरूपा खांडेभराड, कृतिका आतुरकर, गौरव रायकर,सौरभ भाग्यवंत, निलेश शिवरकर दर्शन कातखडे, करण शिवरकर ,बालाजी नवले, निळकंठ वारुळे ,गौरव पाबळे, रिद्धी गुप्ता, पार्थ गुप्ता, आर्यन पवार, राघव झोरे,अरुण शिवरकर,यांना बेल्ट वितरण करण्यात आले यावेळी आजच्या परिस्थितीमध्ये मुलांनी मैदानावर खेळणे फार महत्त्वाचे आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचां शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो त्यामुळे पालकांनीही आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे

असे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी विद्यार्थ्यांना केले ,तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळातही विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरी केली तर तुम्हाला नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले

तर संजय देशमुख सर यांनी आजची पिढी मोबाईल मध्ये जास्त गुंतलेली आहे मोबाईल पासून दूर करायचे असेल तर पालकांनी विद्यार्थ्यांच्या खेळण्यावर भर दिला पाहिजे असे मार्गदर्शन त्यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार तायडे यांनी केले या कार्यक्रमाला मगर सर आणि सपाटे सर उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये