खडकपूर्णा जलाशयातून अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल
10 लाखाचा ऐवज जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
खडकपुर्णा जलाशय च्या सिंनगावजहांगिर शिवारात एक फायबर बोट व एक इंजिन बोटी द्वारे अवैधरित्या रेती उपसा करून चोरी केल्याचे 22 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता आढळून आल्यानंतर महसुल विभागाने सदर चोरी करणाऱ्या बोटी व रेती ही एन डी आर एफ च्या पथकाच्या साहाय्याने उप विभागीय अधिकारी यांच्या समक्ष खडकपुर्ना जलाशयात जिलेटीन द्वारे नष्ट करण्यात आले.
घटनेची फिर्याद ग्राम महसूल अधिकारी मधुकर उदार यांनी पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी आरोपी साफीकूल शेख इरफान शेख वय 32 वर्षे, समुल शेख नजरुल शेख वय 34 वर्षे दोन्ही रा पियारपुर ता. राधानगर जि. साहेबगंज राज्य. छतीसगड, . मो सावा करीम मो. आबु बक्कर वय 25 वर्षे रा. बेगमगंज ता. राधानगर जि. साहेबगंज राज्य छतीसगड , बाळू नवले रा. सिनगाव जहा ंगीर ता दे राजा जि बुलडाणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळावरून एक फायबर बोट व एक इंजिन बोट, त्यामध्ये अंदाजे तीन ब्रास रेती, असा एकूण अंदाजे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहे.
नमुद घ ता वेळी व ठिकाणी यांतील आरोपी हे खडकपूर्णा जलाशयात सिनगाव जहागीर शिवार एक फायबर बोट व एक इंजिन (सक्शन) बोटी व्दारे अवैधरित्या रेतीची उपसा करुन रेतीची चोरी केल्याचे मिळुन आल्याने सदर चोरी करणा-या बोटी व रेती ही (NDRF) चे पथकाचे सहयाने तसेच मा.उप विभागीय अधिकारी सि.राजा यांच्या समक्ष खडकपूर्णा जलाशयात जिलेटीन व्दारे नष्ट करण्यात आली आहे. अशा फिर्यादीचे तोडी रिपोर्ट वरुन अप सदरचा दाखल करून तपासात घेतला.