Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पांग्री येथे संडास चे टाके खोदल्याप्रकरणी वडिलांना मुलाकडून मारहाण 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यांतील पांगरी शिवारात फिर्यादी यशवंता देऊजी वाघ वय 72 वर्ष व आरोपी कृष्णा यशवंता वाघ हे एकमेकांचे बापलेक असुन ते वेगवेगळे राहतात. 22 जानेवारी रोजी सकाळी साडे सहा वाजता फिर्यादी यांनी हरिआलेम वाघ यांचे वाटणी हिश्श्यात संडास टाकं बांधण्याकरिता गडडा खोदला असता, आरोपी हा त्यांना म्हणाला की, तुम्ही माझ्या घराच्या पाठीमागे गडडा का खोदला या कारणावरुन भांडण करुन शिवीगाळ केली.

तसेच फिची सुन कविता हरिआम वाघ हिला घरामध्ये येउन पोटामध्ये लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिचे खिशातील मोबाइल काढुन फोडुन टाकला तसेच फिचे गळ्यातील रुमाल आवळुन भिंतीवर लोटले. त्यामुळे फिचे डाव्या बरगडीवर मार लागुन जख्मी केले. घटनेची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी आरोपीकृष्णा वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल रामकिसन गिते करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये