ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कॅप्टन मोहन गुजरकर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणास रवाना 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

स्थानिक 21 महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियनचे एन.सी.सी. अधिकारी तथा रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर यांची निवड ‘यशदा’ पुणे येथे 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान तीन दिवसीय ‘समुदाय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणा’करीता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे झालेली असून ते रवाना झालेले आहे.

कॅप्टन गुजरकर यांनी ‘होमगार्ड चे जिल्हा समादेशक म्हणून कार्यभार सांभाळलेला असून पदावर असताना जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनात महत्वाची भुमीका निभविलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा प्रशासनाकडून त्यांना पाचदा ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आलेला आहे. एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून कॅप्टन मोहन गुजरकर यांची ख्याती आहे.

सद्ध्या देवळीच्या एस.एस.एन.जे.कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक व प्रहार समाज जागृती संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये