तिरवंजा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठा महोत्सव समजल्या जाणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन तिरवंजा येथे दिनांक १८व१९ जानेवारीला करण्यात आले आहे.
यानिमित्ताने विवीध धार्मिक तथा सामाजीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात ग्रामसफाई, भजन संध्या, घटस्थापना, हळदकुंकू, समाजप्रबोधन, रामधुन, जागृती भजन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे याप्रसंगी आयोजित शोभायात्रेत परीसरातील ७२भजन मंडळे सहभागी होणार आहे.सदर महोत्सवात आ.संजय देरकर,आ.सुधाकर अडबोले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
या महोत्सवाला परीसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजणे यांनी केले आहे.



