देवळी येथे 24 व 25 जानेवारी 2025 ला महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघ व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा देवळी द्वारा आयोजित महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत 24 25 व वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धाचे आयोजन विदर्भ केसरी रामदासजी तडस इंडोर स्टेडियम देवळी येथे होणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिनांक 24 जानेवारी 2025 ला सायंकाळी सात वाजता होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या शुभहस्ते व माजी खासदार नवनीत राना यांच्या अध्यक्षतेखाली राज्यसभा खासदार अनिल बोंडे, वसंतराव देवपुजारी अखिल भारतीय संपर्कप्रमुख संस्कृत भारती मुख्यालय नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगर संघ संदीप भोंडवे सरचिटणीस महाराष्ट्राचे कुस्तीगीर संघ हिंदकेसरी योगेश दोडके, जिल्हाध्यक्ष सुनील गपाट माजी आमदार दादाराव जितके चे माजी खासदार सुरेश वाघमारे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
बक्षीस वितरण सोहळा दिनांक 25 जानेवारी 2025 ला सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली, व महाराष्ट्र राज्याचे गृह ग्रामीण सहकार शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर प्रसाद भानकर संघटन मंत्री क्रीडा भारती मुख्यालय जयपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार समीर कुणावर, आमदार राजेश बकाने, आमदार प्रताप अडसळ, आमदार सुमित वानखेडे, आमदार उमेश ला कॉल कर व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत 2024 पंचवीस करिता 65 किलो ते 76 किलो वजन गटात वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक पद कुस्ती स्पर्धा वजन गटात होणार आहे या स्पर्धेला महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील व महानगरपालिका क्षेत्र असे एकूण 51 संघ सहभागी होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पैलवान अमृता पुजारी कोल्हापूर भाग्यश्री कोळी पुणे प्रतीक्षा बागणी सांगली वैष्णवी पाटील कल्याण स्वाती शिंदे कोल्हापूर धनश्री खंड नगर नंदिनी साळुंखे कोल्हापूर आश्लेषा बागडे सोलापूर यांच्यासह 400 महिला पैलवान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंच प्रशिक्षक व व्यवस्थापक सहभागी होणार आहे. महिला पैलवानाचा वजन घट व तपासणी दिनांक 25 जानेवारी 2025 ला दुपारी बारा वाजता पासून सुरू होईल स्पर्धेतील महिला महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानास चांदीची गजा रोख व इतर विजेत्यांना पुरस्काराचे वितरण होणार आहे.
महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत 2024 पंचवीस व वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेकरिता महाराष्ट्रातील नामांकित महिला पैलवान उपस्थित राहणार आहे. या स्पर्धा बघण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांना उपस्थित राहण्याच्या आव्हान यावेळी आयोजक महाराष्ट्र राज्य कुस्तीकर संघाचे अध्यक्ष माझी खासदार रामदास तडस व स्वागताध्यक्ष आमदार राजेश बकाने यांनी केले.