गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डी. बी. पथकाची दारुबंदी कायद्यान्वये कारवाई  

एकुण 6 लाख 90 हजार रू चा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

            दि. 15/03/2024 रोजी डी बी पथकातील पोलीस स्टाफ, चेतन पिसे, जगदीश चव्हान, सचिन घेवंदे, स्वप्नील जिवने, आकाश कांबळे, रविन्द्र आडे यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की, विशाल झाडे रा. संत ज्ञानेश्वर वार्ड शाहलंगडी रोड हिंगणघाट व धिरज उर्फ गांजा गजानन साळवे वय 19 वर्ष रा.शास्ञी वार्ड हिंगणघाट असे संगणमत करून त्याचे मारोती सुझुकी कंपनीच्या काळ्या रंगाच्या MH01AH0838 कारने देशी दारूची विनापास परवाना अवैद्यरित्या वाहतुक करून जाम मार्गे संत ज्ञानेशवर वार्ड हिंगणघाट कडे येत आहे अशा माहीती वरून ज्ञानेशवर वार्ड हिंगणघाट येथील रोडवर नमुद पंच व पो स्टाफ यांनी नाकेबंदी करून प्रो रेड केला असता आरोपी क्र 1) धिरज उर्फ गांजा गजानन साळवे वय 19 वर्ष रा.शास्ञी वार्ड हिंगणघाट हा मिळुन आला व आरोपी कार चालक विशाल झाडे हा कारमधुन पसार झाल्याने आरोपी धिरज उर्फ गांजा गजानन साळवे वय 19 वर्ष रा.शास्ञी वार्ड हिंगणघाट याचे ताब्यामधुन 90 एम एल च्या देशी दारूने भरून असलेल्या 18 खोक्याचे खर्ड्यात एकुण1800 शिश्या प्रति शिशी 100/रू प्रमाणे 1,80,000/रू व एक काळ्या रंगाची मारोती सुझुकी कंपनीची MH01-AH0838 चार चाकी कार किंमत अंदाजे 5,00,000/रू व नमुद आरोपीचे झडतीत मिळालेला विवो कंपनीचा स्मार्ट फोन किं 10,000/रू असा एकुण 6,90,000/रू चा माल मिळुण आल्याने नमुद दोन्ही आरोपीतांविरूध्द दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

               सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री नरूल हसन सा.मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा.मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री मनोज गभने याचे निर्देशाप्रमाणे, पोलीस स्टाफ, चेतन पिसे,जगदीश चव्हान, सचिन घेवंदे, स्वप्नील जिवने, आकाश कांबळे, रविन्द्र आडे यांनी केली .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये