“गांजा अंमली पदार्थाची विक्री करणा-या सराईत गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 01 एप्रिल 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकाने पोलीस स्टेशन गिरड हद्दीत, पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून मौजा कोरा, आकर वार्ड नं. 03 येथे राहणारा सराईत गांजा विक्रेता संजय विनायक कोम्पलवार याचे राहते घरी एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, नमुद गुन्हेगार संजय कोम्पलवार व त्याची पत्नी सौ. ज्ञानेश्वरी संजय कोम्पलवार असे दोघेही संगणमताने गांजा अंमली पदार्थाची विक्री करतांना मिळुन आल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीतांचे ताब्यातुन निव्वळ 04 किलो 51 ग्रॅम गांजा अमली पदार्थ, गुन्ह्यात वाहतुकीकरीता वापरलेली होंडा शाईन कंपनीची मोटर सायकल एम.एच. 32 ए.झेड. 9690 व मोबाईलसह जु.कि. 2,11,775 रू चा मुद्देमाल जप्त करून, दोन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. गिरड येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. प्रकाश लसुंते, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक, व म.पो.अ. दुर्गा सिडाम पो स्टे गिरड यांनी केली.



