ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माणिकगड सिमेंट वर्क्सतर्फे गोपालपूर येथे महिलांसाठी मासिकधर्म स्वच्छता जनजागृती व सॅनिटरी पॅड वितरण कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

माणिकगड सिमेंट वर्क्सच्या सी एस आर उपक्रमांतर्गत गोपालपूर येथे महिलां व किशोरी मुलींकरिता मासिकधर्म स्वच्छता जनजागृती व सॅनिटरी पॅड वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश ग्रामस्तरावर महिला व किशोरींमध्ये स्वच्छता, आरोग्य आणि मासिकधर्माविषयी योग्य जागरूकता निर्माण करणे हा होता.

कार्यक्रमाचे संचालन सोनाली ठाकरे (माणिकगड कंपनी – सी एस आर फील्ड समन्वयक) यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोपालपूरच्या आशा वर्कर पोर्णिमा जाधव यांनी सांभाळले.

महिलांना मासिकधर्म स्वच्छतेचे महत्त्व, स्त्रीरोग प्रतिबंध, तसेच किशोरींमध्ये वाढत्या वयात होणाऱ्या बदलांविषयी सविस्तर माहिती ऋतु पानपट्टे (उजास प्रकल्प, चंद्रपूर) यांनी दिली. या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांना आरोग्यविषयक योग्य ज्ञान मिळाले.

याशिवाय कार्यक्रमात नंदिनी कुमारी (माणिकगड कंपनी अधिकारी) यांनीही मार्गदर्शन करून महिलांना स्वच्छतेच्या सवयी, आरोग्य संवर्धन आणि नियमित तपासण्यांचे महत्त्व पटवून सांगितले.

कार्यक्रमात महिलांना व किशोरी मुलींना सॅनिटरी पॅडचे मोफत वितरण करण्यात आले. गावातील नागरिक व उपस्थित महिलांनी माणिकगड सिमेंट वर्क्सच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

हा उपक्रम महिलांच्या आरोग्य जागरूकतेसाठी आणि ग्रामीण भागातील स्वच्छता संवर्धनासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि स्तुत्य पाऊल ठरले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये