Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

मेघदूत लॉन सेवाग्राम रोड वर्धा येथे स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन

अंमलदारांच्या गुणवंत पाल्यांना सुद्धा गौरवचिन्ह देऊन सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 15/1/2025 रोजी वर्धा जिल्हा पोलीस दलामध्ये नोकरीचे पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष यशस्वीरित्या पूर्ण ण केल्याबद्दल सन 2000 च्या बॅचमेटनी मेघदूत लॉन सेवाग्राम रोड वर्धा येथे स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून माननीय श्री पवन कुमार शुक्ला पंडित गुरुजी माझी राखीव पोलीस निरीक्षक तसेच मुख पाहुणे माननीय श्री राजेश जी उमरे सहाय्यक फौजदार तथा वर्धा जिल्हा क्रीडा प्रमुख माननीय श्री अनंता ठाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरावती शहर हे आमंत्रित होते.

कार्यक्रमादरम्यान सुरुवातीला बॅचमधील दिवंगत अंमलदार रमेश ससाने योगेश विषयी संजय मुजबले व प्रवीण नागरे यांना विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कैलास सोनवणे नंदकिशोर पवार बुलढाणा अनिल भुक्तार हिंगोली , सुनिता चर्पे सुवर्णाघडे व वंदना भारस्कर यांनी केले कार्यक्रमाकरिता उपस्थित अंमलदारांना अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह प्रदान केले तसेच अंमलदारांच्या गुणवंत पाल्यांना सुद्धा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या पर्वावर अंमलदारांच्या पत्नींना 2000 बॅचमधील महिला मधला रानी मकर संक्रांतीच्या पर्वावर अंमलदारांच्या पत्नींना 2000 बॅचमधील महिलांनी हळदी कुंकू लावून स्वागत केले पोलीस विभागात उत्कृष्ट सेवेबाबत माननीय पोलीस महासंचालक म.रा. मुंबई यांचेकडील विशेष पदक पोहवा अमरलाखे व म पो हवा सत्यभामा लोणारे यांना मिळाल्याने त्यांचा सुद्धा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन 2020 चे अधिकारी झालेले व प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री अनंता ठाकरे यांनी केले.

तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत नांदेडकर व किशोर शेंद्रे योगेश हिवसे यांनी करून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शंकर भोयर यांनी नी केले सदरचा स्नेह सदरचा स्नेहमेलन 16 सन 2000 बॅचमधील सर्व पुरुष व महिला अंमलदार यांच्या सहकार्याने पार पडला

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये