Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अवैध दारूची वाहतूक संबंधाने कारवाई

संट्रो वाहनासह एकूण 5 लाख 95 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       सविस्तर याप्रमाणे आहे कि, आज रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने मुखबिराच्या गुप्त खबरेवरून पो.स्टे. तळेगाव हद्दीत नाकाबंदी केली असता यातील आरोपी हा आपल्या ताब्यातील सेंट्रो कार वाहनांमध्ये वरनमूद दारूचा मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करत आहे असे समजल्यावरून त्याचा पाठलाग करून वाहन अडविले असता नमूद आरोपी जाग्यावरून पसार झाला. त्याचा इतरत्र शोध घेतला असता तो मिळुन आला नाही तरी सदरची सर्व कार्यवाही ही दोन पंच्यासमश करून 1) एक सिल्वर रंगाची SANTRO कार क्र. MH-31 BB 3471, कि. 4,00,000 रू. 2) RS कंपनीच्या 180 ml च्या विदेशी दारूने भरलेल्या 41 नीपा प्रत्येकी 350 रू प्रमाणे 14,350 रू 3) 180 ml ने oc Blue कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 62 निपा प्रत्येकी 350 रू प्रमाणे 21,700 रू 4) 180 ml च्या आयकोनिक कंपनीच्या 10 निप 350 प्रमाणे 3500 5)500 ml ची tunarg बिअर डब्बे 12 नग 300 रू प्रमाणे 3600 रू 6) 180 ml च्या देशी बॉबी कंपनीच्या 384 निपा प्रति शिशि 150 प्रमाणे 57600 रू 7) 90 ml ने भरलेल्या देशी बॉबी दारूच्या 950 शिश्या प्रति शीशि 100 रू प्रमाणे 95,000 रू असा जु.किं. 5,95,750 रू चा मुद्देमालसदराचा 5,95,750/- रुपयाचा मुद्देमाल व वाहन पो.स्टे तळेगाव यांच्या ताब्यात देऊन सतनामसिंग बावरी, रा. वर्धमनेरी, तळेगाव,वर्धा (पसार) आरोपी विरुद्ध पो.स्टे. तळेगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 सदर कारवाई मा. पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विनोद चौधरी, पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे, सागर भोसले, पो. अंम. संघसेन कांबळे, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये