ताज्या घडामोडी

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन.

चांदा ब्लास्ट :

गडचांदूर,,
कोरपना तालुक्यातील मौजा खैरगव, बोरी नवेगाव ग्रामपंचायत कढोली खुर्द, आवळपूर येथील विविध विकासकामांचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यामध्ये सार्वजानिक बांधकाम विभाग क्र.१ चंद्रपूर, आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये मौजा खैरगावं येथील शासकीय खुल्या जागेत सभामंडप बांधकाम करणे किंमत १० लक्ष, मौजा आवाळपुर येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे संरक्षण भिंत, सुशोभीकरण व शौचालय बांधकाम करणे किंमत १५ लक्ष,
ग्रामपंचायत कढोली खुर्द अंतर्गत बोरी नवेगाव येथील- लोहबळे ते कुळमेथे व चायकाठी यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे किंमत ५ लक्ष, समाज मंदिर ते देवतळे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे किमंत १० लक्ष, आणि अंगणवाडी इमारत बांधकाम करणे किंमत ११ लक्ष इत्यादी विकासकामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, जेष्ठ नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, माजी उपसभापती संभाजी कोवे, जेष्ठ नेते सुरेश मालेकर, खैरगावचे सरपंच रोशन मारापे, सिद्धार्थ वानखेडे, मुरलीधर बल्की, राहुल बोडे, प्रा. आशिष देरकर, अभय मुनोत, यु. काँ. तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, मंदाताई डंबारे, शंकर पेचे, रमेश बोरकर, सुरेश धोटे, धोंडू चौधरी, ग्रा प सदस्य एकता वानखेडे, स्वाती नगराळे, मनीषा कोटे, मुन्ना मासिरकर, गणेश लोंढे, बालचंद्र मुन, बालचंद्र मडावी, दत्ता मसे, साईनाथ कुंभारे, ग्राम पं.सदस्य उमाजी आत्राम, भास्कर मत्ते, वृंदाबाई वडस्कर, रंजनाताई आत्राम, विजय बोंडे, अरविंद बोंडे, हरी पाटील पिपळकर, सुधकर वडस्कर, बंडू चिंचोलकर, जयवंत वडस्कर, जगन दरेकर, राजेंद्र पिंपलशेंडे यासह स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये