ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री संत झिंगुजी महाराज यांचा ८४ वा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा

विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा भाविकांनी घेतला लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

           श्री संत झिंगुजी महाराज देवस्थान समितीच्या वतीने श्री संत झिंगुजी महाराज यांचा ८४ वा पुण्यतिथी महोत्सव विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाद्वारे पार पडला.

     सदर महोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना व श्री ची पूजा आरती, नगर स्वच्छता अभियान, भजन, रांगोळी स्पर्धा,भजन संध्या, ह.भ.प. श्री सावता केशव फुले सनसर ,पुणे यांचे भारुड व जागृती भजन घेण्यात आले.दुसऱ्या दिवशी योग्या नेत्रालय व सर्जिकल सेंटरचे नेत्रशल्य चिकित्सक डॉ .प्रशांत नागपुरे व डॉ. मोनिका नागपुरे यांच्या सौजन्याने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.यावेळी १२० रुग्णांची नेत्र तपासणी करून ५४ लाभार्थ्यांना चष्मे वितरीत करण्यात आले. स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आले.

यावेळी महिला-पुरुषांची रक्त तपासणी करण्यात आली.त्यानंतर श्री संत झिंगुजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रवचनकार सविता दिघोरे यांचे प्रवचन झाले, सायंकाळी सत्कार समारंभ प्रशस्तीपत्र व बक्षीस वितरण तसेच गुणवंतांचा सत्कार घेण्यात आला.यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी खासदार हंसराजभैय्या अहिर, चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष कृष्णाजी नागपुरे,माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, विदर्भ भोई समाजसेवा महिला संघटना अध्यक्ष रंजना पारशीवे, श्री गुरुदेव प्रचारक विशाल गावंडे,रमेश नागपुरे यांची उपस्थिती होती. सायंकाळी सप्त खंजिरी राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य तथा दूरदर्शन कलाकार ह.भ.प.तुषार सूर्यवंशी महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.

      शेवटी ह.भ.प. संजयजी शिंदे महाराज यांचे गोपाल काल्याचे किर्तन व दहीहंडी, श्रीच्या पालखीची प्रमुख मार्गाने भजनदिंडीसह भव्य मिरवणूक, प्रशांत शिंदे यांचे सौजन्याने सुमधुर संगीतमय भावभक्तीपर गीतांचा नागपूर येथील जगराता कार्यक्रम, त्यानंतर भव्य महाप्रसाचा हजारो भाविकांनी व नागरिकांनी आस्वाद घेतला. या ३ दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये