क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाकेबंदी करित आरोपीकडुन चारचाकी वाहनासह देशी दारू जप्त

एकुण किंमत 4 लाख 46 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, वर्धा येथे दिनांक 09/06/2023 रोजी कार्यालयीन कामकाज करीत असतांना ना.पो.शि अमर लाखे यांना मिळालेल्या खात्रीशीर खबरे वरून वर्धा उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांनी मौजा दहेगांव अमरावती वर्धा हायवे रोडवरील गतीरोधक जवळ नाकेबंदी करून आरोपीवर प्रोव्हीशन रेड – केला असता आरोपी नामे मंगेश प्रकाश पाटमासे वय 28 वर्ष रा. इंदीरा नगर, वार्ड न. 17 देवळी, ता. देवळी जि.वर्धा हा देशी दारूची वाहतुक करीत असतांना मिळुन आले आरोपीचे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती पांढऱ्या रंगाची शेवरलेट कंपनीची U-va चारचाकी वाहन क्र.एम.एच/02/सी. व्ही / 3099 अंदाजे किमत 4,00,000/- रू त्या गाडीचे डिक्की मध्ये 2) 180 एम. एल. च्या देशी दारूने भरून असलेल्या गोवा कंपनिच्या 6 खर्रडयाचे पुर्ण खोक्यामध्ये तसेच 1 अर्ध्या खर्रडयाचे खोक्यामध्ये एकुण 312 शिश्या प्रति नग 150 /- रू प्रमाणे एकुण 46,800 /- रू. असा कारसह एकुण जु किंमत 4,46,800 /- रू. चा माल अवैध्यरित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने पंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आला.

आरोपीनी देशी दारूचा माल हा अमरावती जिल्हातील उदय बार येथील राजु जयस्वाल रा. सावंगी मेघे, वर्धा यांचे बार मधुन आणला असे सांगीतल्या वरून बार चे चालक / मालक राजु जयस्वाल यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असतांना सुध्दा वर्धा जिल्हातील आरोपी क्र. 1 यास दारूचा माल देवुन त्यास सहकार्य केल्याने त्याचे कृत्य म.दा.का. कलम 82 प्रमाणे होत असल्याने सदर बार मालक / चालक राजु जयस्वाल यास आरोपी बनविण्यात आले.

केलेल्या कार्यवाही संबंधी पोलीस स्टेशन सावंगी मेघे, येथे दोन्ही आरोपीताविरूध्द अपराध क्रमांक 318 / 2023 कलम 65. (अ) (ई) 77 (अ) 82 83 म.दा.का सहकलम 3 (1) 181, 130 / 177, मो. वा. का नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. सावंगी मेघे, येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरूल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री डी.सी. खंडेवार सा. याचे सुचनेप्रमाणे, तसेच पो.उप.नि परवेज खान, संजय गायकवाड यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे नापोशि अमर लाखे, पो.शि. पवन निलेकर, समीर शेख, मंगेश चावरे, प्रमोद वाघमारे, राजु यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये