ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवासेना तर्फे गुणवंत विद्यार्थीचा व नवनियुक्त पदाधिकारीचा सत्कार

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, युवासेनाप्रमुख आदित्य उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना जिल्हा प्रमुख मनिष जेठानी यांच्या नेतृत्वात, युवासेना जिल्हा सनमव्यक दिनेश यादव यांच्या सहकार्याने स्नेहसंमेलन कार्यालय सरदार पटेल वॉर्ड वरोरा येथे शालेय गुणवंत विद्यार्थीचा व युवतीसेना नवनियुक्त पदाधिकारीचा सत्कार सोहळा पार पडला.

सत्कार संभारंभाला उदघाटक म्हणून युवासेना कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे, प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे, प्रमुख मान्यवर निलेश बेलखेडे गोंडवाना सिनेट सदस्य तथा युवासेना पुर्व विदर्भ विभागीय सचिव, युवासेना सचिव रोहिणी पाटील उपस्थित होते.

हर्षल काकडे, मुकेश जिवतोडे, निलेश बेलखेडे, रोहिणी पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थीना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच हर्षल काकडे यांच्या हस्ते नवनियुक्त युवतीसेना जिल्हा चिटणीस राजश्री वैद्य व युवासेना तालुका प्रमुख ओंकार लोडे यांच्या हस्ते, युवतीसेना उपतालुका प्रमुख तेजस्विनी हनुवते यांचा शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

त्यावेळी गुणवंत विद्यार्थीना योग्य मार्गदर्शन हर्षल काकडे, मुकेश जिवतोडे,निलेश बेलखेडे,रोहिणी पाटील यां मान्यवाराणी आपल्या भाषणातुन व्यक्त केले. त्यावेळी सत्कार संभारंभाचे संचालन विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, प्रास्ताविक युवासेना जिल्हा प्रमुख मनिष जेठानी, आभार प्रदर्शन युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय झिले यांनी केले.

कार्यकमाला सहकार्य युवासेना जिल्हा सनमव्यक तथा माजी नगरसेविक दिनेश यादव, युवासेना तालुका प्रमुख ओंकार लोडे, उपतालुका प्रमुख अमोल काळे, उपतालुका प्रमुख अक्षय ताजने,शहर प्रमुख पियुष सिंग, उपतालुका प्रमुख अक्षय झिले, युवती सेना उपतालुका तेजस्विनी हनुवते यांनी केले.

त्यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, शहर प्रमुख संदीप मेश्राम, माजी नगरसेवक तथा शहर संघटक किशोर टिपले, माजी नगरसेविका सुषमा किशोर भोयर, माजी नगरसेविका प्रणाली संदीप मेश्राम,शिवदूत बंडुजी डाखरे, तालुका प्रमुख विपीन काकडे, उपतालुका प्रमुख सागर पिपंळशेंडे, अनिल गाडगे, अतुल नांदे, वंदना बंडुजी डाखरे,युवासेना विभाग प्रमुख किशोर पंधरे, कपिल धकाते,रोशन नन्नावरे,दिव्यानि चौधरी समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका, युवती सैनिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये