ताज्या घडामोडी

एक लाखाचे बोगस चोर बीटी बियाणे जप्त

कृषी विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती –
शहरातील जगन्नाथ बाबा कृषी केंद्र टप्पा परिसरातील कृषी केंद्रात बोगस बियाने विक्रीसाठी ठेवले असता कृषी विभाग व भद्रावती पोलिसांनी धाड टाकून १ लाखाच्या बियानासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. केंद्र संचालक महेश वांढरे व सहकारी दीपक हरिदास गेडाम यांना अटक करण्यात आली. भद्रावती येथील जगन्नाथ बाबा कृषी केंद्रामध्ये कापूस जातीचे बोगस बियाणे विक्रीसाठी ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली त्या आधारे जिल्हा गुणवत्ता निरीक्षक कृषी विभाग श्रावण बोढे व भद्रावती पोलीस यांनी संयुक्त कारवाई केंद्रावर धाड टाकली यात १२९ पाकीट चोर बीटी बियाणे किंमत १ लाख असा माल जप्त करण्यात आला. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली ही कारवाई कृषी अधिकारी श्रावण बोडे, ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुशांत गाडेवार, अरुण झाडे, पंकज ठेंगणे, पी एस इंगळे, अनुप आष्टीकर, विश्वनाथ चुधरी व निकेश ठेंगे यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये