ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजप महिला कार्यकर्त्यांकडून ऑटो चालक बांधवांसोबत रक्षाबंधन उत्सव

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी शहरात रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला.

यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेविका सविता कांबळे, भारतीय जनता पक्षाच्या माजी महामंत्री किरण बुटले माजी नगरसेविका चंद्रकला सोयाम शीला चव्हाण माया उईके, आशा अबोजवार संगीता खांडेकर मोनीषा महातव सुनिता जयस्वाल यांच्यासह इतर भाजप महिला कार्यकर्त्यांनी शहरातील ऑटोचालक बांधवांना राखी बांधून त्यांचा सन्मान केला. तसेच, सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यातर्फे भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.महिला कार्यकर्त्यांनी सांगितले की, “रक्षाबंधन हा पवित्र नात्याचा सण असून, अनेक कष्टकरी बांधव आपल्या कामामुळे आपल्या बहिणीकडे जाऊ शकत नाहीत. अशा वेळी आम्हीच त्यांच्या बहिणी म्हणून त्यांच्याकडे जाऊन राखी बांधून हा सण साजरा करतो.”

संपूर्ण शहरभर झालेल्या या उपक्रमामुळे कामगार आणि ऑटोचालक बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये