ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शुक्रवारी प्रियदर्शिनी सभागृहात वाद विवाद स्पर्धा

ना.सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती ; आत्मनिर्भर भारत भाजपाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

येथील भारतीय जनता पार्टीच्या आत्मनिर्भर भारत आघाडी तर्फे विदर्भ स्तरीय ‘आवाज विदर्भाचा’ या वाद विवाद स्पर्धेचे आयोजन विविध स्तरावर करण्यात आले.उपांत्य फेरीसाठी निवड झालेल्या चमुची पुढील फेरीसाठी ही स्पर्धा 11 ऑगस्ट ला सकाळी 10 वाजता प्रियदर्शिनी नाट्य सभागृह येथे होणार असून या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे वन,मत्स्यपालन व्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री व पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा ज्येष्ठनेते चंदनसिंह चंदेल,भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रा.)हरीश शर्मा,महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांची उपस्थिती राहणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेने भारताने आत्मनिर्भरते कडे वाटचाल सुरू केलेली आहे. याच संकल्पनेला अनुसरून विदर्भस्तरीय वाद विवाद स्पर्धेचे आयोजन शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विदर्भाच्या वेगवेगळ्या जिल्हयात आयोजित करण्यात आलेली होती.या स्पर्धेचे उद्दीष्ट भावी पिढीत विदर्भाबाबत आत्मीयता निर्माण करणे आहे.अशी माहिती स्पर्धेचे मुख्य संजोजक ऋषिकेश बुटले यांनी दिली.
या कार्यक्रमाला विद्यार्थी व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आत्मनिर्भर भारत आघाडीचे पालक रामपाल सिंह,प्रकाश धारणे,जिल्हाध्यक्ष किरण बुटले व राजेश इंगोले यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये