ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथील माजी विद्यार्थी बत्तीस वर्षानंतर भेटले 

भऱली माजी विद्यार्थांची एक दिवसाची शाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आजच्या धकाधकीच्या जीवनातील जाणारे क्षण कसे,वाऱ्याच्या वेगाने निघून जातात हे कळत सुद्धा नाही असेच काहीसे स्थानिक महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथील 1992 मध्ये दहावीत शिकणाऱ्या विधार्थाच्या बाबतीतही घडले. दहावी पास होऊन आज बत्तीस वर्षाचा काळ लोटला असताना, काही विद्यार्थी लग्न होऊन,जावई,सुना,नातवंड झालेले असताना सुद्धा,चला शिकूया एक दिवसाची शाळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेत.आणि सर्वांच्या आनंदाला परावरच राहिला नाही.

    १९९२ म्हणजे मोबाईलच्या आधीचा काळ,तेव्हा मोबाईल म्हणजे काय माहीतही नव्हते,अशा काळातील दहावी नंतर विखुरलेल्या सवगड्याना बत्तीस वर्षानंतर एकत्र आणण्यासाठी काही वर्गमित्रानी वर्षभर प्रयत्न करून दि .7 जुलै रोजी बालाजी सेलिब्रीर्शन गडचांदूर येथे चला शिकूया एक दिवसाची शाळा,या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विध्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याधापकतथा प्राचार्य बा.ना.मोहितकार होते तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक एल .डी. मोहितकार ,सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष पाथ्रिकर,सेवानिवृत्त पर्यवेक्षक विठ्ठलराव थीपे, सेवानिवृत्त प्राचार्य रमेश पाटील,कृष्णा बत्तुलवार, सौ. प्रतिभा पाथ्रिकर, हनुमान मस्की,कोचेवाड मॅडम,रंगारी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. जीवनात घडताना लाभलेल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाचा मान ठेवीत गुरुजनांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

            विविध कार्यक्रमाची मेजवानी ठरलेल्या कार्यक्रमासाठी विदर्भातील कानाकोपऱ्यातून सवनगडी एकत्र आले होते हे विशेष कार्यक्रमाचे संचालन किर्तीमाला हेपट ,यांनी केले तर आभार चंदा सदनपावर यांनी मानले.कार्यक्रमाचा यशस्वतेसाठी ऍड.संजय निरांजने तुळशीराम पानघाटे,रेखा मेकलवार,संजय मेंढी, नवनाथ मंदे,किशोर मंदे ,प्रशांत निरांजने,मारोती चाफले,दीपक खरवडे आदीनि परिश्रम घेतले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये