Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

तालुका क्रीडा संकुलनातील रनिंग ट्रॅकची दुरुस्ती करा

विद्यार्थ्यांचे तालुका क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

शहरातील तालुका क्रीडा संकुलनात खेळांशिवाय विविध कार्यक्रम घेण्यात येत असल्याने संकुलनातील मैदानावरील रनिंग ट्रॅक खराब झाली आहे. भविष्यात पोलीस भरती तथा इतर स्पर्धा परीक्षा होऊ घातल्याने त्याची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना रनिंग ट्रॅक ची आवश्यकता आहे. मात्र सध्या मैदानावरील रनिंग ट्रॅक खराब झाले असल्याने विद्यार्थ्यांचा धावण्याचा सराव प्रभावित झाला आहे.

त्यामुळे संकुलनातील मैदानावरील रनिंग ट्रॅक त्वरित दुरुस्त करावी व मैदानावर क्रीडा शिवाय अन्य कार्यक्रम घेण्यास बंदी करावी अशा मागणीचे निवेदन शहरातील स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी तालुका क्रीडा अधिकाऱ्यांना सादर केले आहे.

सदर रनिंग ट्रॅक्स स्वखर्चाने दुरुस्त करण्याची तयारी सदर विद्यार्थ्यांनी दर्शवली असून त्यासाठी लगतच्या मुरमाच्या खाणीतून लाल माती उचलण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही सदर विद्यार्थ्यांनी निवेदनातून केली आहे. निवेदन सादर करताना शहरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये