बालाजी नगरीतील खवय्येसाठी सरसावली शबरी’ज किचन
(दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत होणार खाण्याची चंगळ)

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरातील प्रसिद्ध सोन्या-चांदीचे व्यापारी व उद्योजक विनोद धन्नावत यांनी मुख्य मार्गावर डॉक्टर शिंदे हॉस्पिटल समोर *बालाजी कंफर्ट* या नावाने बिल्डिंगचे निर्माण केलेले आहे याच इमारतीत त्यांनी आता शहरातील खवय्यांचे चोचले पुरवण्यासाठी शुद्ध शाकाहारी शबरी’ज किचन फॅमिली रेस्टॉरंट ची सुरुवात केली आहे शहरवासीयांना अनेक वर्षापासून साउथ इंडियन ब्रेकफास्ट ची प्रतीक्षा होती ती या शबरीजमुळे पूर्ण होणार आहे.
वातानुकूलित असलेल्या या शबरीज मध्ये सकाळपासून तर रात्रीपर्यंत खवय्यांची वेगवेगळ्या डिशेस खाण्याची चंगळ होणार आहे फॅमिली व बच्चे कंपनीसाठी त्यांचे मनसोक्त डिशेस या ठिकाणी उपलब्ध असणार आहे तंत्रशुद्ध पद्धतीने निर्माण केलेल्या या शबरीज मध्ये महाराष्ट्रीयन चायनीज साउथ इंडियन राजस्थानीसह अस्सल मराठमोळ लोकांसाठी लागणारे खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहे *घरापासून दूर मात्र घरचेच जेवण* हे या शबरीजचे ब्रीद वाक्य असून एक बार खाओगे तो बार-बार आओगे प्रमाणे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना खुश करण्याचे काम शबरीज किचनचे प्रमुख विक्रम रणजीत सिंग चौहान व त्यांच्या टीम कडून होताना दिसत आहे.



