ताज्या घडामोडी

विसापूर येथे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून धनोजे कुणबी समाजाच्या सभागृहात बोअरवेलचे काम सुरू 

चांदा ब्लास्ट

विसापूर : सामाजिक बांधिलकी जपत आ सुधीर मुनगंटीवार माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे श्री किशोर पंदिलवार यांनी निवेदनाच्या माध्यमातून विसापूर धनोजे कुणबी समाजाच्या सभागृहात बोअरवेल मागणी करण्यात आली होती गेल्या पंच वार्षिक मध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बल्लारपूर तालुका अध्यक्ष किशोर पंदिलवार यांच्या माध्यमातून धनोजे कुणबी समाजाच्या वतीने समाज भवनाची मागणी करण्यात आली होती.

त्यावेळेस सुधीर मुनगंटीवार अर्थ मंत्री असताना समाज भवनासाठी 23 लक्ष रुपयांची मंजुरी देऊन सभागृहाचे बांधकाम पूर्ण करून देण्यात आले होते नंतर वने सांस्कृतिक मत्स्य व्यवसाय मंत्री असतांना सभागृहाच्या वॉल कंपाऊंड साठी 15 लक्ष मंजुरी देऊन ते पण पूर्ण करून देण्यात आले आता धनोजे कुणबी समाजाच्या सभागृहात कुणबी समाज बांधवांच्या माध्यमातून बोअरवेल ची मागणी करण्यात आली असून बोअरवेल चे सुद्धा काम चालू झाले असून विसापूरातील धनोजे कुणबी समाजातील समाज बांधवांनी आ सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबतच श्री किशोर पंदिलवार यांचे आभार मानले.

या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला बल्लारपूर भाजपा तालुका अध्यक्ष किशोर पंदिलवार. विसापूर भाजपा शाखा अध्यक्ष गणेश टोंगे. धनोजे कुणबी समाजाचे जेष्ठ नागरिक योगेश्वर टोंगे.धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष अशोक थेरे.राहुल टांगे. रुपेश कौरासे. किशोर चोपडे.रोशन पायपरे. आकाश टोंगे. विलास पायपरे. गोसाई डाहुले. राजू उपरे आदी समाज बांधव उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये