Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

युरो लिटल्स स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

         स्वागत सेलिब्रेशन हॉल, भद्रावती येथे १४ डिसेंबर २०२४ रोजी युरो लिटल्स स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, गाणी आणि नाटिकांद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले. युरो लिटल्स ग्रुपने यंदा आपल्या ५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा उत्सव साजरा केला, ज्याला ‘५ वर्षांचा उत्कृष्टतेचा प्रवास’ म्हणून संबोधण्यात आले.

याप्रसंगी मानस धनोरकर, पार्थ धनोरकर, अभी हेमके, किशोर हेमके, पांडुरंग हेमके, चंद्रशेखर नायर, प्रमोद नागोसे, कुमुद हेमके आणि कोमल नागोसे आदिंची ऊपस्थिती होती.

युरो लिटल्सचे संस्थापक आणि अध्यक्ष अक्षय हेमके यांनी आपल्या प्रेरणादायी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी बाल शिक्षणाचे महत्त्व आणि लहान वयात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय अभ्यासक्रमासोबतच उपक्रमशैलीची कशी गरज आहे, हे सांगितले. त्यांनी पालकांच्या पाठिंब्याबद्दल आणि शिक्षकांच्या कठोर परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अभी हेमके यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे शिक्षकवृंदांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला विद्यार्थी तथा पालक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये