महात्मा गांधी महाविद्यालयच्या वतीने तिरंगा रॅली उत्साहात काढण्यात आली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथील विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र डी. देव यांच्या हस्ते तिरंगा ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
रॅलीमध्ये विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन ‘हर घर तिरंगा’, देशभक्ती व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. गडचांदूर शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून रॅली काढून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. अजय कुमार शर्मा व NSS समन्वयक श्री. चेतन वानखेडे यांनी केले. प्रा. अनिस खान, श्री. पवन चटारे, डॉ. आर. वाय. पटले, डॉ. मनोहर बांद्रे, डॉ. संदीप घोडिले, श्री. चेतन वैद्य व डॉ. उत्कर्ष मून तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. रॅली उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.



