मनपा मुख्यालयात मुख्य ध्वजारोहण संपन्न
देशभक्तीचा जल्लोष; मनपा पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आज शनिवार १५ ऑगस्ट रोजी चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात मा. महापौर संगीता खांडेकर यांच्या शुभहस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. त्याचप्रमाणे तिन्ही झोन कार्यालये,हुतात्मा स्मारक येथेही धजारोहण पार पडले.
मा. महापौर यांनी राष्ट्रध्वज फडकवून ध्वजाला सलामी दिली. याप्रसंगी उपस्थितांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतांच्या गजरात भारत मातेला अभिवादन केले. शहरातील नागरिकांना संबोधित करताना मा. महापौर संगीता खांडेकर म्हणाल्या, “स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळेच आज आपण हा अमृतकाळ अनुभवत आहोत. चंद्रपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि प्रगतीशील बनवण्यासाठी तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मनपा प्रशासन व नागरिक यांनी खांद्याला खांदा लावून काम करणे गरजेचे आहे.”
या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याला मा. उपमहापौर प्रशांत दानव, मा. स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे, आयुक्त अकुनूरी नरेश, सर्व विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक/नगरसेविका, उपायुक्त संदीप चिद्रावार,उपायुक्त शेषराव टाले,शहर अभियंता रवींद्र हजारे,मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी,मनपाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



