ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोजोली मक्ता येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

ग्रामपंचायत प्रशासक विशाल यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील ग्रामपंचायत गोजोली मक्ता येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी तथा ग्रामपंचायत प्रशासक विशाल यादव यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताने परिसर दुमदुमून गेला.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला गावातील जिल्हा परिषद शाळा, श्रीराम आदिवासी आश्रमशाळा, नवजीवन विद्यालय, सर्व अंगणवाडी केंद्रातील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषवाक्ये आणि गीत आणि देशभक्ती मनोगत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये