ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मा. पोलीस महासंचालक यांचे सन्मानचीन्ह व प्रशिस्तीपत्र प्रजासत्ताक दिनी मा. पोलीस अधिक्षक वर्धा यांचे तर्फे प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 26.01.2024 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय, वर्धा येथे प्रजासत्ताक दिन सर्व अधिकारी कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचे सोबतच सामान्य नागरीक यांचे उपस्थीतीत संपन्न झाला.

प्रजासत्ताक दिनी मा. पोलीस महासंचालक यांचे तर्फे देण्यात येणारे पोलीस पदक मा. पोलीस अधिक्षक वर्धा यांचे हस्ते पोलीस पदक प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांना वाटप करण्यात आले.

श्री. संदीप तिरमदास कापडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तथा सायबर सेल, वर्धा यांना दरोडेखोर / गुन्हेगारांच्या टोळया किंवा अघोर व तंत्रबध्द गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराच्या विरूध्द केलेली कारवाई बाबत पोलीस पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

श्री. कुलदीप रविंद्र टांकसाळे, पोलीस हवालदार, सायबर सेल, वर्धा यांना क्लिष्ट आणि थरारक बहुचर्चीत गुन्हयांची उकल केल्याबाबत पोलीस पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

श्री. अमर वसंतराव लाखे, पोलीस हवालदार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, वर्धा यांना त्यांनी पंधरा वर्षाचा सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबाबत पोलीस पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

उपरोक्त अधिकारी व कर्मचारी यांचे त्यांनी केलेल्या कामगीरीबाबत मा. पोलीस अधिक्षक वर्धा श्री. नूरूल हसन, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. डॉ. सागर रतनकूमार कवडे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

जिल्हा क्रिडा संकूल येथे झालेल्या गणतंत्र दिवासाचे कार्यक्रमादरम्यान सायबर साक्षरता अभीयान -2024 च्या सायबर पो.स्टे.च्या रथाला प्रथम क्रमांक व रस्ते सुरक्षा अभीयान – 2024 च्या वाहतूक शाखेच्या रथाला व्दितीय क्रमांक देण्यात आला. सदर पारीतोषीक व प्रमाणपत्र मा. जिल्हाधिकारी साहेब श्री. राहूल कर्डीले यांचे हस्ते देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये