Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जाफराबाद चौफुलीवर पून्हा अपघात., दोन जखमी 

मोटारसायकलला वाचविताना ट्रक पलटी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जाफराबाद चौफुलीवर अपघाताची शृंखला चालूच आहे,21 डिसेंबर रोजी रात्रि 9.30च्या दरम्यान जालना येथून बुऱ्हाणपूर ला भुसा भरून जात असताना आयशर ट्रक क्र एम एच 43 वाय 4387 चौफुलीवर जाफराबाद कडून येणाऱ्या मोटारसायकल ला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक पलटी होऊन पुलाखाली पडला.

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी जखमी ट्रक चालक अशोक सोलसे वय 60 व आकाश सोलसे वय 35 यांना ट्रक मधून बाहेर काढले, उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले, या अपघातात सुदैवाने प्राणहानी झाली नाही मात्र ट्रकचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनस्थळी येऊन पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये