ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव राजा शहर कडकडीत बंद
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
स्व संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ तसेच सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी द्या या मागण्यासाठी सर्व समाज बांधवांच्या वतीने आज देऊळगाव राजा शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन केले होते, सर्व व्यापारी बंधूंनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद होती, बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बस स्थानक चौकात सर्व समाज बांधव एकत्रित येऊन सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली, मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला,तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी शहरात जागो जागी बंदोबस्त चोख ठेवला होता.